Kapil Sibal On Mamta Banerjee: ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया म्हणाले, 'काँग्रेस शिवाय यूपीए म्हणजे आत्मा नसलेले शरीर'
Kapil Sibal & Mamta Banarjee (Photo Credit - PTI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी राष्ट्रवाधीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भेटीनंतर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी एक वक्तव्य केल कि "आता यूपीए नाही" आहे. या कथित टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट (Tweet) केले की, "काँग्रेस शिवाय यूपीए म्हणजे आत्मा नसलेल्या शरीरासारखे असेल. विरोधकांची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाले होते की, राजकारणासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी त्यांची इच्छा आहे का, असे विचारले असता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आता यूपीए नाही.

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांच्या विधानाचा प्रतिवाद करत काँग्रेसने बुधवारी म्हटले की, जो राजकीय पक्ष केवळ स्वतःचा विचार करतो तो भाजपला पराभूत करू शकत नाही. काँग्रेसने असेही म्हटले आहे की असे प्रदर्शन निष्फळ ठरेल आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला मदत करेल. (हे ही वाचा Rahul Gandhi On Central Government: सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीवरून राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा.)

लोकशाहीसाठी काँग्रेस हाच पर्याय - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या "अत्याचार" विरोधात काँग्रेसने सुरू केलेली लढाई संपूर्ण देशाला माहित आहे. "कोणताही पक्ष थेट किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका करून भाजपच्या विरोधात लढू शकत नाही, विशेषत: जर तो त्याचा राजकीय फायदा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा विचारात घेत असेल. देश आणि लोकशाहीसाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे.

थोरात म्हणाले की, काँग्रेसने गेली सात वर्षे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी निर्भयपणे लढा दिला आहे. “भाजप आणि इतर पक्षांनी त्यांच्या (राहुल) आणि त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ले केले आहेत. त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोहिमा सुरू झाल्या, पण राहुल गांधी मागे हटले नाहीत.