Gurmeet Ram Rahim Singh. (Photo Credits: PTI)

Gurmeet Ram Rahim Parole: हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक (Haryana Assembly Elections 2024) होत आहे. दरम्यान, बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग (Gurmeet Ram Rahim) याने 20 दिवसांच्या पॅरोल (Parole) ची मागणी केली आहे. यापूर्वी त्याला 13 ऑगस्ट रोजी 21 दिवसांच्या रजेवर सोडण्यात आले होते. तो सध्या रोहतकच्या सुनारिया कारागृहात आहे. सध्या डेरा प्रमुखाचा पॅरोज संदर्भातील प्रस्ताव सरकारने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सल्लामसलत करण्यासाठी पाठवला आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राम रहीमवर आहे. 2017 मध्ये 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यापासून राम रहीम 10 वेळा पॅरोलवर तुरुंगाबाहेर गेला आहे. या काळात त्याने एकूण 255 दिवस म्हणजे आठ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात काढला आहे. त्याच्या अनेक पॅरोल आणि रजेची मुदत हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमधील निवडणुकांशी जुळते. (हेही वाचा -Gurmeet Ram Rahim Gets Parole Again: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यास पॅरोल मंजूर; बलात्कार, हत्या प्रकरणात भोगतोय तुरुंगवास)

दरम्यान, याप्रकरणासंदर्भात बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, राम रहीमचा पॅरोल अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी राम रहीमला बागपत येथील डेरामध्ये राहण्यासाठी 21 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. डेरा प्रमुखाला वारंवार पॅरोल आणि रजा मंजूर केल्याच्या प्रकरणासंदर्भात अलीकडेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. (हेही वाचा -Dera Manager Murder Case: डेरा मॅनेजर हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमसह इतर 4 जणांची निर्दोष मुक्तता)

पॅरोल म्हणजे काय?

पॅरोल ही एक प्रकारची रजा आहे, ज्यामध्ये कैद्याला काही खास कारणासाठी कारागृहातून बाहेर येण्याची परवानगी दिली जाते. हे अंडरट्रायल कैद्यांच्या बाबतीतही आढळते. यामध्ये कैद्याला तुम्हाला बाहेर का जावे लागेल याचे विशिष्ट कारण सांगावे लागते. उदाहरणार्थ, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे किंवा वैद्यकीय कारणांमुळे कैद्यांना ही सूट दिली जाते, ज्याला पॅरोल म्हणतात. पॅरोलचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे कोठडी पॅरोल आणि नियमित पॅरोल.