Dera Manager Murder Case: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग (Gurmeet Ram Rahim) आणि इतर चौघांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केले आहे. गुरमीत राम रहीमने त्याच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या अपीलला परवानगी देताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये अवतार सिंग, कृष्ण लाल, जसबीर सिंग आणि सबदिल सिंग यांचा समावेश होता. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला. 2019 मध्ये, पत्रकार, राम चंदर छत्रपती आणि डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येशी संबंधित दोन खून खटल्यांमध्ये पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवले होते. (हेही वाचा -Ram Rahim Parole: डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पुन्हा 50 दिवसांचा पॅरोल; 29 दिवसांत दुसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर येणार)
तथापी, 18 ऑक्टोबर 2021 रोजी कोर्टाने या प्रकरणात राम रहीम आणि इतर चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच डेरा प्रमुखाला 31 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर गुरमीर राम रहीम यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, पत्रकार हत्या प्रकरणातील त्यांचे अपील प्रलंबित आहे. (हेही वाचा - Gurmeet Ram Rahim Gets Parole Again: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यास पॅरोल मंजूर; बलात्कार, हत्या प्रकरणात भोगतोय तुरुंगवास)
Just in: Punjab and Haryana High Court acquits Dera Sacha Sauda Chief Gurmeet Ram Rahim Singh and others in Ranjit murder case. #GurmeetRamRahim pic.twitter.com/6GaewCojha
— Bar and Bench (@barandbench) May 28, 2024
राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद आहे. त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी ते सध्या 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांची 2002 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, डेरा प्रमुखाच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर प्रकाश टाकणारे पत्र प्रसारित करण्यामागे राम रहीमचा हात असल्याचा संशय आहे.