Rahul Gandhi Bike Riding (PC - Twitter/ANI)

Rahul Gandhi Ladakh Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लडाख (Ladakh) मध्ये बाईक रायडिंग (Bike Riding) करत आहेत. राहुल गांधी यांचे रायडर लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी बाईकवरून पॅंगोंग लेकवर पोहोचले आहेत. राहुल गांधी 20 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील राजीव गांधी यांचा वाढदिवस पॅंगोंग तलावावर साजरा करणार आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी लडाखच्या त्यांच्या पहिल्या दौऱ्यात लेहमध्ये 500 हून अधिक तरुणांशी संवाद साधला.

काँग्रेसचे लेह जिल्हा प्रवक्ते नामग्याल यांनी सांगितले की, राहुल गांधी 25 ऑगस्टपर्यंत लडाखमध्ये राहतील. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे. राहुल गांधी शुक्रवारी कारगिल स्मारकावर पोहोचले. यावेळी स्थानिक तरुणांसोबत त्यांनी लेहमध्ये फुटबॉलचा सामनाही पाहिला.

यावेळी राहुल गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मला बाईक चालवणे खूप आवडते. माझ्याकडे केटीएम बाईक आहे. पण ती उभीचं असते. सुरक्षेत तैनात असलेले जवान त्यांना बाईक चालवू देत नाहीत, असंही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं.

राहुल गांधी लडाखला जात असताना ते लेह शहरातून त्यांच्या KTM 390 ड्यूक मोटारसायकलने नयनरम्य पॅंगोंग तलावाकडे पोहोचले. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये काँग्रेस नेत्याने म्हटले आहे, जे माझे वडील म्हणायचे पँगॉन्ग लेक हा जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.