पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आज आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यापूर्वी, तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), असम (Assam) आणि पुडुचेरी (Puducherry) येथे मतदानाची प्रक्रिया आधीच पार पडली आहे. महत्वाचे म्हणजे, पश्चिम बंगालसह या पाचही राज्यांतील निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. परंतु, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर हाती येणार्या एक्झिट पोलकडे (Exit Polls) सार्यांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोल्स हे निवडणूकीचे अंतिम निकालाचे काय चित्र असेल? याचा अंदाज वर्तवतात. News24 कडून जाहीर करण्यात येणार्या एक्झिट पोल लाईव्ह कसा आणि कुठे पाहायचा ? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे
देशात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकांना 27 मार्च पासून सुरु झाली होती. तर, आज अखरेचा टप्पा पार पडला आहे. येत्या 2 मे रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. तत्पूर्वी आज विविध वृतवाहिन्या एक्झिट पोलद्वारे जनमताचा कौल नेमका कोणत्या पक्षाला असेल, याचा अंदाज बांधण्यात येणार आहे. हे देखील वाचा- West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये आज 35 जागांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू; भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बजावला मतदानाचा हक्क
न्युज 24 टूडे चाणक्य एक्झिट पोल लाईव्ह कुठे पाहाल?
महत्वाचे म्हणजे, देशातील सध्याची कोविड परिस्थिती पाहता खबरदारीच्या दृष्टीने विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. तर, मतमोजणीच्या ठिकाणी देखील उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालत येणार्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे.