पुडुचेरी विधानसभा निवडणूक 2021 च्या (Puducherry Assembly Election 2021) 30 जागांसाठी एकूण 323 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. काँग्रेस आणि भाजप-एआयएनआरसी-एआयएडीएमके युती यांच्यातील लढाई आहे. कांग्रेस डिएमकेसह पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. तर, या निवडणुकीत विजयी झेंडा फडकवण्यासाठी भाजपने आखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि एआयडीएमके यांच्यासहीत अन्य लहान दलांसोबत युती केली आहे. यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पद्दुचेरी विधानसभा निवडणूक 2016 च्या निकालानंतर व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि डिएमके यांच्या युतीचे सरकार आले होते. तर, व्ही नारायणसामी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली होती. परंतु, त्याच वर्षी आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अल्पमतामुळे व्ही नारायणसामी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे देखील वाचा- ABP C Voter Exit Poll Result 2021: पुदुचेरी मध्ये भाजपाला 19-23 जागा मिळण्याची शक्यता
अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस 16, भाजप 9 आणि उर्वरीत जांगावर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कडगम निवडणूक लढवित आहेत. एनडीए युतीचे नेतृत्व एआयएनआरसीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी करीत आहेत. एनडीएने एन. रंगास्वामी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत यानम आणि थंचनवाडी हे हाय प्रोफाइल म्हणून ओळखले जात आहेत. रंगासमी येथे निवडणूक लढवत आहेत. ते एनडीएचे मुख्यमंत्री उमेदवार आहेत. त्याचवेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए.व्ही. सुब्रमण्यम हे त्यांच्या जन्मगाव कराईकल (उत्तर) येथून निवडणूक लढवत आहेत.
माजी पीडब्ल्यूडी मंत्री ए नमसिवायम भाजपाच्या तिकिटावर मन्नादीपिप सीटवर निवडणूक लढवित आहेत. ही जागा देखील खूप महत्वाची आहे. त्याचवेळी माजी मंत्री एमओएचएफ शाहजहां कामराज नगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
एआयएडीएमकेचे नेते ए अंबालागण अप्पलम आणि ओम सखी सेगर ऑर्लिनपेट सीटवरुन निवडणूक लढवित आहेत. उप्पलम सीटवर त्याची चांगली पकड आहे. 2001 पासून ते अंबालागणच्या निवडणुका सतत जिंकत आहेत.