Priyanka Gandhi Vadra On PM Narendra Modi: प्रियांका गांधींच मोदींना पत्र, लखीमपुर घटनेतील मुख्य आरोपीना तुम्ही वाचवतायत
Priyanka Gandhi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधानानी (PM Narendra Modi) देशात नव्यानं लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली, आणि तब्बल वर्षभराने शेतकऱ्यांच्या लढा यशस्वी ठरला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस (Congress) महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी स्वागत केले आहे. अशातच कायदे मागे घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळं आज संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या (Congress) वतीनं 'शेतकरी विजय दिवस' साजरा करण्यात येणार आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे तसेच शनिवारी पत्रकार परिषेद घेत केंद्र सरकारने आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.

प्रियंका गाधी म्हणताता पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये (DGP) आणि (IG) परिषदेला उपस्थित राहू नये. तसेच गृहराज्यमंत्री अजय मिश्रा  यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये  जाईल. जर त्यांना शेतकर्‍यांची खरोखर काळजी असेल तर त्यांनी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करु नये, त्याच्यावर लखीमपुर घटनेतील शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. जर मोदीं आरोपींना वाचवणयचा प्रयत्न करत असतील तर  हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका गांधी-वाड्रा यांनी म्हटले आहे. (हे ही वाचा Farm Laws To Be Repealed: आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक, ठरणार पुढील रणणीती.)

Tweet

शेतकर्‍यांची हत्या करणारी व्यक्ती गृहराज्यमंत्रीचा मुलगा आहे पंरतु राजकीय दबावामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे असे न होता पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडाळातुन हक्कलपट्टी करावी आणि शेतकरी कुंटूबांंना न्याय द्यावा असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना देशभरातील शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याची आणि मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना अर्थिक भरपाई देण्याची विनंतीही प्रिंयका गांधी यांनी केली आहे