Bihar Shocker: खासगी कोचिंग शिक्षकाची 5 वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण; बेशुद्ध मुलावर रुग्णालयात उपचार सुरू
Private tuition teacher mercilessly beats 5-year-old (PC - Twitter)

Bihar Shocker: बिहारची राजधानी पाटणा (Patna) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोचिंग शिक्षकाने पाच वर्षांच्या मुलाला एवढी मारहाण केली की, तो बेशुद्ध झाला. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा एक व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिक्षक एका निष्पाप मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजधानी पटणा येथील जया कोचिंग क्लासचे आहे. कोचिंग सेंटरमध्ये एका शिक्षकाने मुलाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक निरागस मुलाला आधी काठीने मारहाण करत आहे. लाकूड तुटले तरी शिक्षकांचा राग शांत होत नाही. यानंतर, शिक्षक या मुलाच्या तोंडात मारतो आणि केस ओढतो. यादरम्यान, वेदनेने रडत असताना मूल जमिनीवर पडते आणि ते बेशुद्ध होते. (हेही वाचा - Delhi Shocker: स्कूटीला हात लावल्याने चढला पारा; दिल्लीत रागाच्या भरात 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या)

कोचिंगमध्ये बेशुद्ध पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, ज्या शिक्षकाने मुलाला एवढ्या निर्दयीपणे मारहाण केली, त्याचे नाव छोटू असे आहे. कोचिंग संचालकाचे म्हणणे आहे की, छोटूला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ज्यामुळे तो मुलावर खूप चिडला. दुसरीकडे ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.