
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) G-7 च्या 48 व्या शिखर परिषदेत (Summit G7) सहभागी होण्यासाठी जर्मनीतील (Germany) म्युनिक (Munich) येथे पोहोचले आहेत. PM मोदी आज जर्मनीतील म्युनिक येथे होणाऱ्या G-7 बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते पर्यावरण, हवामान बदलासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी रविवारी त्यांनी म्युनिक येथे पोहोचून भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेऊन त्यांना संबोधित केले. जर्मनीतील म्युनिक येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी रविवारी भारतीय समुदायाला संबोधित केले. आज ते G-7 बैठकीचा भाग असतील आणि G-7 देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या स्वतंत्र बैठकाही घेतील.
जगातील 7 सर्वात मोठ्या आणि विकसित अर्थव्यवस्थांच्या संघटनेच्या बैठकीत, पीएम मोदी जागतिक पर्यावरणीय बदल तसेच हवामान बदलांवर चर्चा करतील आणि ऊर्जा संदर्भात त्यांचा कृती आराखडा सादर करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी G-7 देशांच्या प्रमुखांशी त्यांच्या भेटीदरम्यान अन्न सुरक्षा, आरोग्याशी संबंधित विषयांवर चर्चा करू शकतात आणि दहशतवादासारखे जागतिक मुद्दे ठळकपणे मांडू शकतात. हेही वाचा By Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का; कोण कुठून जिंकलं, जाणून घ्या
म्युनिक, जर्मनीमध्ये पंतप्रधान मोदी आज G-7 बैठकीत सहभागी होणार्या निमंत्रित सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांची आणि नेत्यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. तत्पूर्वी, भारतीय समुदायासोबतच्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या स्वागताला उपस्थित असलेल्या प्रत्येकामध्ये भारताची संस्कृती, एकता आणि बंधुता दिसत आहे.
यासोबतच ते म्हणाले की, 'आज भारतातील प्रत्येक गरीबाला 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा आहे. कोरोनाच्या या काळात भारत गेल्या दोन वर्षांपासून 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्याची हमी देत आहे.