माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान (Photo Credit: PTI)

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रेदशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Chetan Chauhan) यांचे आज निधन झाल आहे. चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची किडनी फेल झाली. ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ (Yogi Adityanath), केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. हे देखील वाचा-Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर मात्र अजुनही व्हेंटिलेटर वर, आजही तब्येतीत सुधारणा नाही

नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया-

योगी अदित्यनाथ यांची प्रतिक्रिया-

अनुराग ठाकूर याची प्रतिक्रिया-

चेतन चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकेआहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले.