President Ramnath Kovind Raigad Visit: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 35 वर्षानी रायगडावर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits: PTI/File)

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आज 35 वर्षानी रायगडावर (Raigad) भेट देणार आहे. छत्रपती संभाजी राजे (Chatrapati SambhajiRaje) यांनी राष्ट्रपती यांना रायगडावर भेटीचे निमंत्रण दिले होते. राष्ट्रपती होळीच्या मार्गावरुन रायगडावरुन उतरणार होते पण शिवप्रेमीच्या विरोधानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर उतरणार आहे आणि छत्रपती शिवाजी महारांजाना आभिवादन करणार आहे. प्रशासनाकडून राष्ट्रपती यांच्या सुरक्षेची योग्य ते काळजी घेतली गेली आहे, तसचे त्यांच्या दोऱ्यासाठी जय्यत तयार सुरु केली आहे. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनानं पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले होते.

तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर

तब्बल 35 वर्षींनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत. या आधी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 साली किल्ले रायगडावर आल्या होत्या. त्यावेळा त्यांनी राज सदरेत मेघ डंबरी उभारण्याची सूचना केली होती. त्यानूसार मेघ डंबरी 1985 साली बांधुन पूर्ण झाल्यावर तिच्या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह किल्ले रायगडावर आले होते. त्यानंतर आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येणार असल्यामुळे किल्ले रायगड आणि परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई विमानतळावरून भारतीय वायूदलाच्या MI17 हेलिकॉप्टरमधून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात निर्माण केलेल्या हेलीपँडवर उतरतील. त्यानंतर रोप वे च्या माध्यमातून राष्ट्रपती किल्ले रायगडावर पोहचतील. (हे ही वाचा 65th Mahaparinirvan Din at Chaityabhoomi Live Streaming: कोरोना संकट पाहता महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी चं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी BMC कडून YouTube, Twitter, Facebook वर थेट प्रक्षेपणाची सोय.)

पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनानं पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लगबग सुरु आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली आहे.

राष्ट्रपती 6 ते 9 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर

6 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट देतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करतील.

7 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती, भारतीय हवाई दलाचा तळ, लोहगाव, पुणे येथे भेट देतील. तिथे ते  हवाई कसरतींची  (फ्लाईंग डिस्प्ले ) पाहणी करतील तसेच  हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधतील.

8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती मुंबईत क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीला राष्ट्रपती प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड हा विशेष सन्मान प्रदान करतील.