Grand Order Of The Yellow Star: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना सुरीनाम (Suriname) चा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. सुरीनामचे अध्यक्ष चंद्रकिप्रसाद संतोखी यांनी मजबूत द्विपक्षीय संबंधांबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांचा सत्कार केला. गृह मंत्रालयाने ट्विट केले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचे राष्ट्रपती संतोखी यांच्या हस्ते 'ग्रँड ऑर्डर ऑफ द यलो स्टार' (Grand Order Of The Yellow Star) हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी सत्कार समारंभात आपल्या भाषणात सांगितले की, मला देशातील सर्वात मोठ्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे मी खूप आनंदी आहे. केवळ मलाच नाही तर 140 कोटी भारतीयांना या सन्मानाचा अभिमान वाटतो. या सन्मानाचे श्रेय त्यांनी इंडो-सूरीनाम समुदायातील लोकांना दिले आणि त्यांच्यामुळेच आमचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनीही या सन्मानाबद्दल राष्ट्रपतींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, सुरीनामचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ यलो स्टारने सन्मानित केल्याबद्दल राष्ट्रपती तुमचे खूप खूप अभिनंदन. सुरीनाम सरकार आणि तेथील जनतेने दिलेला हा विशेष सन्मान दोन्ही देशांमधील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक आहे. (हेही वाचा - Rahul Gandhi Go Gack: राहुल गांधी 'परत जा' म्हणत शिख समूदयातील एका गटाची यूएसमध्ये घोषणाबाजी (Watch Video))
राष्ट्रपती मुर्मू यांनी सोमवारी सुरीनामचे राष्ट्रपती संतोखी यांची भेट घेतल्यानंतर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेचे नेतृत्व केले. यावेळी त्या म्हणाल्या की, मला येथे येऊन खूप आनंद होत आहे. तुमचा आदरातिथ्य आणि स्वागत पाहून मला खूप आनंद झाला आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध हा दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा पाया आहे.
Congratulations to Rashtrapati Ji on being conferred the highest civilian award of Suriname – Grand Order of the Chain of the Yellow Star. This special gesture from the Government and people of Suriname symbolizes the enduring friendship between our countries. @rashtrapatibhvn https://t.co/rmR2A0Bsgy
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2023
राष्ट्रपती मुर्मू यांनी याकडे लक्ष वेधले की दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. व्यापार वाढवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. औषधनिर्माण, आयुर्वेद, कृषी आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आणखी सहकार्याला वाव आहे. भारत देशाच्या गरजेनुसार, सुरीनामच्या विकास आणि बांधकामासाठी तांत्रिक सहकार्य आणि योगदानासाठी वचनबद्ध आहे. विविध औपचारिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासोबतच राष्ट्रपतींनी परमारिबो येथील काही मुलांचीही भेट घेतली. त्यांनी मुलांना भारतात बनवलेली चॉकलेट्स खायला दिली.