President Murmu Serves Dahi-cheeni to Nirmala Sitharaman: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना राष्ट्रपती भवनात 2024 चा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करण्यापूर्वी 'दही-साखर' (Dahi-Cheeni) खाऊ घातली. संसदेत जाण्यापूर्वी सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णायक दुसरी टर्म मिळवल्यानंतर 2019 मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनलेल्या सीतारामन यांनी त्यांच्या नियुक्तीपासून प्रत्येक वर्षी सातत्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि पायाभूत सुविधांपासून ते शिक्षण आणि आरोग्यसेवेपर्यंत विविध क्षेत्रांसाठी बजेट सादर केले जाणार आहे. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. (हेही वाचा -Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार अर्थसंकल्प)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Finance Minister Nirmala Sitharaman meets President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan, ahead of the Budget presentation at 11am in Parliament.
(Source: DD News) pic.twitter.com/VdsKg5bSLG
— ANI (@ANI) July 23, 2024
दरम्यान, निर्मला सितारामन महागाईचा सामना करण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकतील. तथापी, अर्थमंत्री सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, मध्यम कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढू शकते. (हेही वाचा - Union Budget 2024: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी; बाजार उघडताच Sensex 80,731.97 वर)
Union Minister of Finance and Corporate Affairs Smt Nirmala Sitharaman along with Minister of State for Finance Shri Pankaj Chaudhary and senior officials of the Ministry of Finance called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan before presenting the Union Budget. The… pic.twitter.com/y386kgOyUG
— President of India (@rashtrapatibhvn) July 23, 2024
दही-साखर खाण्यामागे काय आहे मान्यता?
धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी दही आणि साखर खाल्ल्याने त्या कार्यात यश मिळते. यासोबतच व्यक्तीचे प्रलंबित कामही पूर्ण होतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दही आणि साखरेचा पांढरा रंग चंद्राशी संबंधित मानला जातो आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. अशा स्थितीत दही आणि साखरेचे सेवन केल्याने मन शांत आणि एकाग्र राहते. त्यामुळे कोणतेही काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. असे केल्याने व्यक्तीला त्या कामात यश मिळण्याची शक्यताही वाढते.