Goa CM Pramod Sawant: प्रमोद सावंत होणार गोव्याचे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
Pramod Sawant (Photo Credit - Twitter)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपने बाजी मारली आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे गोव्याचे (Goa CM) पुढील मुख्यमंत्री असतील. सोमवारी झालेल्या भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची घोषणा केल्याबद्दल प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आणि यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदीचे मानले आभार

गोव्याचे नामनिर्देशित मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, "मला पुढील 5 वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो. गोव्यातील जनतेने मला स्वीकारले याचा मला आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. (हे देखील वाचा: Rahul Gandhi On Central Govt: राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाना, आकडेवारी मांडत महागाईपासुन लोकांना वाचवण्याची गरज)

Tweet

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. विधानसभेत भाजपची स्थिती सुखरूप असल्याचे दिसत आहे.