ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी (Photo Credits-ANI)

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज (18 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. यादरम्यान मोदी यांची भेट ममता बॅनर्जी यांनी त्यांना मिठाई आणि कुर्ता सुद्धा दिला. त्याचसोबत पश्चिम बंगाल मध्ये येण्याचे आमंत्रण सुद्धा दिले आहे. तर मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी असे म्हटले की, त्यांच्यासोबत झालेल्या भेटीत उत्तम चर्चा झाली आहे. तर दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा पंतप्रधान पद मोदी यांना देण्यात आल्यानंतर त्यांची भेट घेतली नसल्याचे ही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.बॅनर्जी यांनी राज्यासाठी 13500 करोड रुपयांची मागणी केली आहे. त्याचसोबत मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीला ममता बॅनर्जी यांनी 'चेअर टू चेअर मीटिंग' असे म्हटले आहे.

तर मोदी यांच्यासोबत झालेली भेट ही कोणत्याही राजकीय विषयासंबंधित नव्हती. तसेच भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना सुद्धा भेटण्याची इच्छा असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळे जर अमित शहा यांनी वेळ दिल्यास त्यांची उद्याच भेट घेणार आहे. तर देशातील सर्वात दुसऱ्या मोठ्या कोल ब्लॉकचे उद्घाटन मोदी यांनी करावे असा ही आग्रह ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्याकडे केला आहे.(गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली 69व्या वाढदिवसादिवशी आई हीराबेन यांची भेट)

बॅनर्जी यांनी मोदी यांच्याकडे भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. 20 सप्टेंबर पर्यंत दिल्लीत ममता बॅनर्जी असणार आहेत. तर मंगळवारी मोदी यांच्या सोबत ममता बॅनर्जी यांची भेट होणार होती. परंतु मोदी यांच्या वाढदिवसामुळे ती भेट आज झाली आहे.

परंतु लोकसभा निवडणूकीदरम्यान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामधील वाद चांगलेच पेटले होते. नरेंद्र मोदी केंद्रातून निवडून आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. परंतु तरीही या दोघांमधील वाद सुरु असताना देखील ममता बॅनर्जी यांनी मोदींना एक-दोन कुर्ते पाठवणे सुरुच ठेवले होते. याबाबत अधिक खुलासा मोदी यांनीच केला होता. तर एका मुलाखतीदरम्यान मोदी यांनी ममता दीदी माझ्यासाठी आज ही कुर्ते पाठवतात असे म्हटले होते.