UP Election 2022 (Photo Credit - Twitter)

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लखनौमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. भटक्या जनावरांमुळे ज्यांना नुकसान सहन करावे लागले त्यांना 3 हजार रुपयांची भरपाई दिली जाणार असून गोधन न्याय योजना सुरू करण्यात येणार आहे. बुधवारी यूपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे वर्णन करताना, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाले की, सरकार आल्यावर वीज बिल माफ केले जाईल, कोविड प्रभावित कुटुंबांना 25,000 रुपये दिले जातील. तसेच काँग्रेस 20 लाख सरकारी नोकऱ्या देणार आहे.

Tweet

कोणत्याही आजारासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मदत

प्रियंका गांधी म्हणाल्या की, कोणत्याही आजारासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. गायीचे शेण 2 रुपये किलोने खरेदी केले जाईल, ज्याचा वापर पुढे वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी केला जाईल. ते म्हणाले की, लहान आणि मध्यम उद्योगांना अधिक फटका बसला आहे, सरकारकडून कोणतेही सहकार्य नाही. आम्ही क्लस्टर्सचा विकास आणि समर्थन करू.

Tweet

आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, शाळेच्या फीवर नियंत्रण ठेवले जाईल, सुमारे 2 लाख रिक्त अध्यापनाच्या जागा भरल्या जातील. शिक्षक आणि 'शिक्षा मित्र' नियमित केले जातील. आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केजी ते पीजीपर्यंतचे (KG To PG) शिक्षण मोफत दिले जाणार आहे. (हे ही वाचा Uttarakhand Assembly Elections 2022: महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari यांच्या नातेवाईक Maya Koshyari यांचा निवडणूकीपूर्वी BJP ला रामराम ठोकत कॉंग्रेस मध्ये प्रवेश)

 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत मतदान होणार सुरू

उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघांसाठी 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यादरम्यान, यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्याचवेळी 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.