Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

राज्यात सरकार स्थापन होवून आज जवळजवळ 24 दिवस झालेत पण सत्तासंघर्षासह प्रतिष्ठेची लढाई संपण्याचं काही चिन्ह नाही. सत्ताधारी विरुध्द विरोधक नाही तर शिवसेना (Shiv Sena) विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) रंगला आहे. कुठली शिवसेना खरी आणि कुठली शिवसेना खोटी ही प्रतिष्ठेची लढाई राज्यात बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख कधीही माध्यमांपुढे येवून बोलले नाहीत पण सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाचं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिलेली आहे.

 

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची ही मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीचा  टीझर (Teaser) नुकताच प्रदर्शित झाला असुन सामनाचे संपादक संजय राऊतांकडून हा त्यांच्या अधिकृत ट्विटरवर (Twitter) शेअर (Share) करण्यात आला आहे. मुलाखतीच्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे  शब्द प्रामुख्याने ऐकायला मिळत आहे. या टिझरमध्ये धनुष्यबाण कोणाचा? ठाकरेंना शिवसेना खरी का खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहे असे संजय राऊत यांनी विचारले आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सामनामधील शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे तरी या मुलाखतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टिझरने मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे.

 

शिंदे सेना विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. तरी दोन्ही कडून रोजी आरोप प्रत्यारोपाची मालिका दोन्ही बाजूने बघायला मिळते. उध्दव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीत काही गौप्यस्फोट करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तरी मुलाखत द्यायचीच होती तर ती इतर कुठल्या माध्यमाला, वृत्तपत्राला किंवा वृत्तवाहिनीला का नाही,सामनालाचं का? असा सवाल विचारत काही स्तरातून उध्दव ठाकरे यांना ट्रोलही केल्या जात आहे. तरी सामनाच्या या मुलाखतीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.