Lok Sabha Elections 2019 Phase 6: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ने केले मतदान, गुरुग्रामच्या एका शाळेत जाऊन बजावला मतदानाचा हक्क
virat kohli voting Photo Credits : ANI

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशाचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. गुरुग्रामच्या एका शाळेमध्ये विराट आपल्या भावासह मतदान करायला गेला होता. आज दिल्लीतील ७, हरियाणातील १०, उत्तर प्रदेशातील १४, झारखंडमधील ४, बिहारमधील ८, बंगालमध्ये ८ आणि मध्य प्रदेशात ८ जागांवर मतदान होत आहे. How To Vote #India Google Doodle: मतदान कसं करावं हे सांगणारं आजचं खास गूगल डूडल

क्रिकेटपटू विराट कोहलीचे मतदान

 

नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. त्यात विराट कोहलीही अपवाद नाही. लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे असा संदेश क्रिकेटपटू विराट कोहली आज सकाळी आपला भाऊ विकाससोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मूळचा दिल्लीचा असणा-या विराटचे घर गुरुग्राममध्ये असल्यामुळे त्याने तेथील एका शाळेत जाऊन मतदान केले. विराट कोहली मतदानकेंद्रावर पोहोचताच लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली.

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात ५९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी ४४ जागा भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत जिंकल्या होत्या. टीएमसीने ८, कॉंग्रेसने २ आणि अन्य ५ जागांवर विजयी झाले होते. पूर्वांचलमध्ये फक्त आजमगढ जागा विरोधी पक्षाला गेली होती. तिथे मुलायम सिंग यादव विजयी झाले होते.