लोकसभा निवडणूक 2019 मधील ऐतिहासिक विजयानंतर स्मृती ईरानी यांचे अमेठी येथील जनतेसाठी आशादायी ट्विट
Smriti Irani (Photo Credits: PTI)

2019 च्या लोकसभा निवडणूकीत (Loksabha Elections 2019) भाजपचा (BJP) दणदणीत विजय झाला. यावरुन भारतात अजूनही मोदी लाट कायम असल्याचे सिद्ध झाले. पूर्व भारत आणि पश्चिम बंगाल मध्ये देखील मोदींची जादू चालली. उत्तर प्रदेशात सबा-बसपा यांचे महागठबंधन कामी आले नाही तर पश्चिम बंगालमध्येही ममता बनर्जी कमाल दाखवू शकल्या नाहीत.

तर अमेठीमध्येही जनतेने काँग्रेससोबत असलेले आपले नाते तोडत भाजपच्या स्मृती ईरानी यांनी विजयी केले आहे. स्मृती ईरानी यांनी अमेठीशी जोडलेल्या नात्याचा परिणाम त्यांना अखेर पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशातील महत्त्वाचा असलेला अमेठी या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांचा 55,120 मतांनी विजय झाला.

या दमदार विजयानंतर स्मृती ईरानी यांनी अमेठीच्या जनतेचे आभार मानले आहेत. आज सकाळी खास ट्विट करत स्मृती यांनी लिहिले की, "अमेठीसाठी एक नवीन सकाळ. एक नवा संकल्प. धन्यवाद अमेठी. शत शत नमन. तुम्ही विकासावर विश्वास ठेवला आणि कमळाचे फुल फुलले."

स्मृती ईरानी यांचे ट्विट:

2014 च्या निवडणूकीत राहुल गांधी काही मतांच्या फरकाने जिंकले होते. यंदा मात्र जनतेने राहुल गांधी यांच्या पदरी निराशा टाकली आहे. मात्र केरळमधील वायनाड येथून राहुल गांधी यांचा विजय झाला आहे.