'शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार', काँग्रेस आमदार के.सी. पाडवी यांचे सूचक विधान
Maharashtra Next CM (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोणाचे सरकार स्थापन होईल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपने (BJP) विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यपालांकडून शिवसेना पक्षाला (ShivSena) सत्तास्थापनेचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार राज्यात शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस ( Congress-National Congress Party) एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील, असे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेसकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला होता. परंतु, शिवसेना राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र देण्यास असमर्थ ठरली आहे. मात्र, यानंतरही राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेस नेते आणि आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी शक्यता व्यक्त निर्माण झाली आहे. या निवडणुकीनंतर शिवसेना- भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होती. दरम्यान, भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राजकारण अधिकच पेटले. सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सोमवारी सायंकाळी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला, पण मुदतीत काँग्रेसकडून पत्रच प्राप्त झाले नाही. पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आणि तोंडघशी पडावे लागले. “सत्ता स्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. निकाल सकारात्मक असेल वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,” अशी शक्यता के. सी. पाडवी यांनी व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- शिवसेना नेते संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टीनंतर प्रकृतीमध्ये सुधारणा

एएनआय ट्वीट-

सध्या राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेबाबत निमंत्रण देण्यात आले आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करण्यास समर्थ ठरेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.