West Bengal Assembly Elections 2021: शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये नाही लढवणार विधानसभा निवडणूका; Mamata Banerjeeच्या पाठिशी राहणार उभी!
shivsena | (Photo Credit: File Photo)

महाराष्ट्राबाहेर देखील पक्ष विस्ताराचा विचार करणार्‍या शिवसेनेने आता पश्चिम बंगाल मध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणूका न लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सध्या पश्चिम बंगाल मध्ये मीडीया, मनी आणि मसल पॉवर ममता दीदींच्या विरोधात वापरली जात आहे असं नमूद करताना शिवसेना निवडणूक लढण्याऐवजी त्यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी आज त्याबद्दल ट्वीट करताना ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'Real Bengal Tigress'अर्थात बंगालची वाघीण असा केला आहे. शिवसेनेने यापूर्वी पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं होतं पण आता शिवसेने ममता दीदींच्या पाठीशी उभि राहणार असल्याचं सांगत हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत घेतला असल्याचंही संजय राऊतांनी नमूद केले आहे.

संजय राऊत ट्वीट

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेना, कॉंग्रेस सह एनसीपीचं सरकार आहे. तर पश्चिम बंगाल मध्ये कॉंग्रेस सोबत डावे पक्ष आहेत. पश्चिम बंगाल मध्ये 27 मार्च पासून 29 एप्रिल दरम्यान 8 टप्य्यांत मतदान होणार आहे. 2 मे दिवशी निकाल जाहीर केला आहे.