
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कार्यक्रम उद्या एका छोटेखानी स्वरूपात सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. यामध्ये अनेक नव्या मंडळींना स्थान मिळण्याची शक्यता आहे तर काही जुन्या नावांना यंदा डच्चू दिला जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र यामध्ये रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तर्फे मंत्रिमंडळात एक नाव निश्चित असल्याचे समजत आहे. रिपाई पक्षाचे सचिव अविनाश महातेकर (Avinash Mahatekar) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांची पुष्टी करत स्वतः रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ही माहिती दिली आहे.
रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंकडून एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार आठवले यांनी महातेकर यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे समजत आहे.आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्यापुर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेटत घेतली होती. यामध्ये त्यांनी मंत्रिमंडळात रिपाइंला जागा ठवण्यासोबतच येत्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंला 10 जागा सोडण्याची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे देखील आठवले यांनी सांगितले. अखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू
काही दिवसांपूर्वी वित्त व व्यवस्थपन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत माहिती दिली होती. गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचा उमेदवार तर कॅबिनेट मंत्रिपदांसाठी मित्रपक्षाचे सदस्य अशी वर्गवारी निश्चित करण्यात आली होती.