निवडणूक आयोगाने (Election Commission) देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे (Assembly elections) वेळापत्रक जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणुका होत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशातील काही जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) टीका केली आहे. गोवा राज्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या उपस्थितीचा भाजपला सर्वाधिक फायदा होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये राऊत म्हणाले की, टीएमसी (TMC) कॉंग्रेससह इतर पक्षांमधील "अस्थिर नेत्यांना" सामील करत आहे आणि अशी वृत्ती भाजपशी लढत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. त्यांनी दावा केला की गोवा विधानसभा निवडणुकीसाठी टीएमसी (TMC) प्रचंड खर्च करत आहे आणि अनेकांचे म्हणणे आहे की पक्षाने खर्च केलेल्या पैशाचा स्रोत "इतर" आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उद्दिष्ट काँग्रेसचे अस्तित्व पुसून टाकणे असेल तर ते समजण्यासारखे आहे, पण बॅनर्जी यांचेही तेच उद्दिष्ट असेल तर ते त्यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही, असे राऊत म्हणाले. ते म्हणाले की, गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि आता तो फक्त दोन जागांवर कमी झाला आहे.
गोव्यात काँग्रेसकडे तगडे नेतृत्व नाही, हे त्याचे कारण असल्याचे राऊत म्हणाले. गोव्याची निवडणूक जिंकणे भाजपसाठी सोपे नाही, असा दावा त्यांनी केला, परंतु आप आणि टीएमसीसारखे पक्ष भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेसच्या मार्गात अडथळे आणत आहेत. (हे ही वाचा Assembly Elections 2022: गोवा आणि उत्तर प्रदेशातील जागांवर शिवसेना लढवणार निवडणूक, शिवसेना खासदार संजय राऊतांची माहिती)
गोव्यातील सर्व 40 विधानसभा जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केले. भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, आम आदमी पार्टी (आप), टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिंगणात आहेत.