राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट (Sachin Pilot) यांना एक झटका दिला आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा (Bhanwarlal Sharma), विश्वेंद्र सिंह (Vishvendra Singh) यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (17 जुलै) आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली.
दरम्यान, सुरेजवाला यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. तसेच, राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यात केंद्रातील एका मंत्र्याचा हात असल्याचेही ते या वेळी म्हणाले. दरम्यान, गेहलोत सरकार पाडण्याबाबतची चर्चा सुरु असल्याची एक कथीत ऑडियो टेप (Audio Tape) व्हायरल झाली आहे. ही टेप व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Congress has suspended MLAs Bhanwar Lal Sharma and Vishvendra Singh from primary membership of the party. The party has also issued show cause notices to them: Congress leader Randeep Surjewala https://t.co/lG4exVa14t— ANI (@ANI) July 17, 2020
सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सरकार पाडण्यासाठी 20 ते 35 कोटी रुपये देऊन आमदारांची निष्ठा खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरजेवाला यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10 लाखांहून अधिक झाली आहे. चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असताना केंद्र सरकार मात्र राजस्थान सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सत्तेच्या मागे धावत आहे. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी)
Cong MLAs Bhanwarlal Sharma, Vishvendra Singh suspended from primary membership of party:Randeep Surjewala
— Press Trust of India (@PTI_News) July 17, 2020
दरम्यान, भाजपने या वेळी चुकीच्या राज्यात काँग्रेसला आव्हान दिले आहे, असा टोलाही सुरजेवाला यांनी लगावला. सुरजेवाला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांच्यासोबत गोविंद सिंह आणि चेतन डुडी हेसुदधा उपस्थित होते. भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह या दोन आमदारांना काँग्रेसमधून निलंबीत केल्याचेही सुरजेवाला यांनी या वेळी जाहीर केले. दरम्यान, गेल्या एक महिन्यांपासून राजस्थानमध्ये आमदार खरेदीचा प्रयत्न सुरु आहे. या प्करणाचा एसओजी चौकशी करत आहे. या प्रकरणात भाजपचा हात असून याची पूर्ण प्रकरणात गजेंद्र शेखावत यांच्या विरोधात एसओजी चौकशी आणि त्यांच्या अटकेची मागणीही सुरजेवाला यांनी या वेळी केली.