Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी
Sachin Pilot, Ashok Gehlot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील राजकीय वाद आता संसदीय राजकारणातून कायदेशीर वळणावर येऊन ठेपला आहे. सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) आज (17 जुलै) आज सुनावणी होत आहे. सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. काल या सुनावणीला सुरुवात झाली होती. मात्र, थोड्याच वेळात ती थांबविण्यात आली होती. आज दुपारी 1 वाजता ही सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपल्याला 30 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. मात्र यातील 5 आमदारांनी पायलट यांची साथ सोडल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या बाजूला पायलट यांच्यासह इतर 19 आमदारांना विधानसभआ अध्यक्ष सीपी जोशी यांनी बजावलेल्या नोटीशीवर न्यायालयात आज सुनावणी होत आहे.

विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह इतर 19 आमदारांना आपले सदस्यत्व रद्द का करु नये आसा सवाल विचारत नोटीस जारी केले होते. तसेच 17 जुलै दुपारी 1 वाजेपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्यात यावे असेही अध्यक्षांनी म्हटले होते. या नोटीशीविरोधात पायलट यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी होत आहे. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी; हरीश साळवे, मुकुल रोहतगी यांच्यासारखे तगडे वकील मांडणार बाजू )

राजस्थानमध्ये प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. एक मोठी राजकीय कायदेशीर लढाई लढली जात आहे. यात पायलट यांच्या बाजून दोन वकील मैदानात आहेत. जेष्ठ वकील हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी हे पायलट यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत. तर, वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने बाजू मांडणार आहेत. ही सुनावणी ऑनलाईन होणार आहे.