राजस्थान: भाजप पक्षाच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Video)
BJP (Photo Credits- Facebook)

अजमेर: भाजप (BJP) पक्षाच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी जबरदस्त राडा झाला. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये पक्षाचे कार्यकर्तेच एकमेकांना मारहाण करताना दिसून येत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, भाजप पक्षाचे उमेदवार भागीरथ चौधरी, माजी आमदार पति भंवर सिंह पलाडा आणि नुकतेच भाजप पक्षात प्रवेश केलेल्या नवीन शर्मा एकत्र एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आणि एकमेकांना मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु वादविदाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु मंचावर प्रथम कोण बोलणार ह्या गोष्टीवरुन दोन गटात वादविवाद झाला. त्यावेळी भाजप उमेदवार भागीरथ नाराज होऊन मंचावरुन निघुन गेले. तर याप्रकरणाची जिल्हाध्यक्षकांकडून चौकशी केली जात आहे.(हेही वाचा-आंध्र प्रदेश: तेलुगू देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोघांचा मृत्यू)

ANI ट्वीट:

तसेच मारहाण सुरु असताना तेथील काही नेत्यांनी परिस्थिती सावरल्यानंतर प्रकरण शांत झाले. परंतु आयोजित करण्यात आलेली सभा गटात झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आली.