Voting | Twitter

राजस्थान (Rajasthan) मध्ये आज 199 विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानासाठी  मतदारांनी रांग लावली आहे. 200 पैकी 199 जागांसाठी आज राजस्थानात मतदान होत आहे.  करणपूरचे  कॉंग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह यांचे निधन झाल्याने त्या मतदान केंद्रावरील मतदान रद्द करण्यात आले आहे. कॉंग्रेस कडून पुन्हा सरकार स्थापनासाठी प्रयत्न केले जातील तर नरेंद्र मोदींच्या करिश्म्याखहली भाजपा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभा मतदारसंघातील एकूण 51,890 मतदान केंद्रांवर एकूण 5,26,90,146 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

राजस्थानमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान होणार असून वसुंधरा राजे, राज्यवर्धन सिंह राठोड, अशोक गेहलोत यांचं राजकीय भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाकरता वेळ देण्यात आला असून आज सकाळीच राज्यवर्धन सिंह राठोड, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, महेंद्रजीत मालवीय यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  वसुंधरा राजे सिंधिया, सचिन पायलट यांनी मतदानापूर्वी देवदर्शन केले आहे.

वसुंधराराजे सिंधिया

सचिन पायलट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदारांना मतदानाचं आवाहन करताना अधिकाधिक लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि नवा विक्रम रचावा असं आवाहन केले आहे.  आज पार पडणार्‍या मतदानाचा निकाल 3 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. मतदान प्रचारामध्ये शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील  राजस्थानात पोहचले होते.

भाजपा- कॉंग्रेसच्या या लढतीसोबत राजस्थानमध्येही लहान पक्ष देखील आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांंची भूमिका देखील निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत. बीएसपीने राजस्थानात जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पार्टी  निवडणूकीत आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारतीय आदिवासी पक्ष, सीपीआय-एम, जननायक जनता पक्ष आणि आझाद समाज पक्ष यांच्याकडूनही आपले उमेदवार देण्यात आले आहेत.