मुंबईतील (Mumbai) मेट्रो कारशेडच्या (Metro Car shed) स्थलांतराचा निर्णय बदलून कारशेड आरेतच ( R A Forest) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचीत शिंदे (CM Eknath Shinde) सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवत काल सकाळी परिसरात आंदोलन करण्यात आलं. पर्यावरणवाद्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण पध्दतीने केलं असलं तरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) बंदोबस्त तैनात होता. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवादी संघटनांच्या या आंदोलनाला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya) हजेरी लावली होती.
'आरे वाचवा' हे आंदोलन पर्यावरणवादी संघटनांचं असलं तरी या आंदोलनात लहान मुलांचा समावेश होता. या आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही लहान मुलं या आंदोलनात सहभागी झाली कशी असा सवाल विचारत राष्ट्रीय बालहक्क आयोगानं मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Fansalkar) यांना नोटीस बजावली आहे. तसेच या आंदोलनात आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हे लहान मुलं आंदोलनात सहभागी असल्यानं आदित्य ठाकरें विरुध्दातही तक्रार करण्यात आली आहे. तसेच संबंधीत कारवाई 3 दिवसात करुन आरोपी असणाऱ्यांविरुदध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ( हे ही वाचा:-Maha Metro In Nagpur: नितीन गडकरी यांनी रचला इतिहास; महाराष्ट्रातील मेट्रोचे Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये नोंदवले नाव)
आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम (Sahyadri Rights Forum) या संस्थेनं केली होती. आरे कारशेड हा कायमचं मुंबईतील वादग्रस्त विषयांपैकी एक आहे. ठाकरे सरकार असताना हे कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात ला होता तरी यावरुन पुन्हा एकदा आरे संरक्षणाचा हा वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.