Digvijay Singh (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय संघर्ष सरु असताना राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट (President's Rule) लागू करण्यात आली. राज्यपालांच्या या निर्णयावर काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना पक्षानंतर तिसऱ्या मोठ्या पक्षाला मंगळवारी 8.30 वाजेपर्यंत सरकार स्थापनेसाठी वेळ देण्यात आला होता. परंतु, वेळी पूर्ण होण्याच्या अगोदरच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यापालांच्या निर्णयावर आता टिका होण्यास सुरुवात झाली आहे. कानपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या दिग्विजय सिंह यांनी राज्यपालांच्या या कृतीवर आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतील अधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. दरम्यान, भाजपने विरोधी बाकावर बसू असे स्पष्ट केल्यानंतर राज्यात सत्ता संघर्ष सुरु झाला. राज्यपालांनी सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. परंतु मंगळवारी तिसऱ्या मोठ्या पक्षाला रात्री 8.30 वाजेपर्यंत सरकार स्थापनेची वेळ देण्यात आली होती. मात्र, ही पूर्ण होण्याअगोदर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यावेळी असे काय झाले की दुपारीच राज्यपालांना केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी लागली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी अमित शाह यांच्या दबावामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला आहे. हे देखील वाचा- सरकार बनवण्याचा आमचा दावा आजही कायम; लवकरच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल- उद्धव ठाकरे

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीदेखील बहुमतासह आलेल्या पक्षाला सरकार स्थापन करता येईल, अशी माहिती राज्यपालांकडून देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजप- शिवसेना यांच्यातील मतभेद दूर होऊन महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होईल? की शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसोबत सत्ता स्थापन करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.