राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मान्यतेने शपथविधी सोहळा संमाप्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मान्यतेने शपथविधी सोहळा संमाप्त

देवश्री चौधरी  यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

कैलाश चौधरी हे राजस्थान राज्यातील बारमेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधित्व करता. ते राजस्थानमधील बायतू विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत.

मै रतन लाल कटारीया यानी घेतली मंत्रिपदाची शपथ

नित्यानंद राय यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

सुरेश अंगडी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अनुराग ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. अनुराग ठाकूर हे नाव क्रिकेट वर्तुळात नेहमी चर्चेत असते. मोदी मंत्रिमंडळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून धोत्रे यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.

उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरपुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधत्व करणारे संजीव बलियान यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रीय लोक दलाच्या अजित सिंह यांना लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पराभूत केले. या विजयामुळे ते जायंट किलर ठरले होते.

Load More

PM Modi Swearing-in Ceremony 2019 Live News Updates:  सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्ये देशातील जनतेने भाजप (BJP) आणि एनडीए (NDA) घटक पक्षांना भरभरुन जनमत दिले. त्यामुळे केंद्रामध्ये भाजप प्रणीत एनडीए सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्ता स्थापन करत आहे. नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाली. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार अस्तित्वात येत आहे. प्रथम नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्यासाठी निवडक खासदार पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हे सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार, 30 मे 2019) सायंकाळी सात वाजता पार पडत आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक प्रमुख नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणूण उपस्थित  आहेत. या सोहळ्याचे ताजे अपेडेट आम्ही आपल्याला इथे देत आहोत.