Modi Cabinet Expansion: नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील 4 खासदार होणार आज मोदींच्या कॅबिनेट मध्ये मंत्री; इथे पहा कोणाची वर्णी लागली?
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

Modi Cabinet Ministers List 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कॅबिनेटचा आज विस्तार होणार आहे. दरम्यान आज संध्याकाळी होणार्‍या या शपथसोहळ्यामध्ये 43 मंत्र्यांची नावं आहेत. काही वेळापूर्वीच त्याची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अवघ्या एक तासावर येऊन ठेपलेल्या या कॅबिनेट मंत्रीपदाच्या विस्तारामध्ये नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil), भागवत कराड (Bhagwat Karad) आणि भारती पवार (Bharti Pawar) या चार जणांचा समावेश आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील या चार जणांसोबतच मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला सुरंग लावणार्‍या ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. सोबत राज्यमंत्री असणार्‍या अनुराग ठाकूर यांची देखील या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट पदी बढती होणार आहे. (नक्की वाचा: PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणाचा राजीनामा, कोणाला संधी? जुने चेहरे OUT नवे IN).

इथे पहा 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी

 1. नारायण राणे
 2. सर्बानंद सोनोवाल
 3. डॉ वीरेंद्र कुमार
 4. ज्योतिरादित्य सिंधिया
 5. रामचंद्र प्रसाद सिंह
 6. अश्विनी वैष्णव
 7. पशुपती कुमार पारस
 8. किरण रिजिजु
 9. राजकुमार सिंह
 10. हरदीप सिंह पुरी
 11. मनसुख मंडाविया
 12. भुपेंद्र यादव
 13. पुरुषोत्तम रुपाला
 14. जी किशन रेड्डी
 15. अनुराग सिंह ठाकूर
 16. पंकज चौधरी
 17. अनुप्रिया सिंह पटेल
 18. सत्यपालसिंह बघेल
 19. राजीव चंद्रशेखर
 20. शोभा करंदलजे
 21. भानू प्रतापसिंह वर्मा
 22. दर्शना विक्रम जार्दोस
 23. मीनाक्षी लेखी
 24. अन्नपूर्णा देवी
 25. ए नारायण स्वामी
 26. कौशल किशोर
 27. अजय भट
 28. बीएल वर्मा
 29. अजय कुमार
 30. देवूसिंह चौहान
 31. भगवंत खुबा
 32. कपिल पाटील
 33. प्रतिमा भौमिक
 34. डॉ सुभाष सरकार
 35. डॉ भागवत कराड
 36. डॉ राजकुमार रंजन सिंह
 37. डॉ भारती पवार
 38. बिश्वेश्वर तुडू
 39. शंतनू ठाकूर
 40. डॉ मुंजापारा महेंद्रभाई
 41. जॉन बार्ला
 42. डॉ एल मुरुगन
 43. डॉ निशीत प्रामाणिक

दरम्यान महाराष्ट्रातून यापूर्वी मोदींंच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे हे मंत्री आहेत. पूर्वीच्या मंत्र्यांमध्ये संजय धोत्रे यांनी आज राजीनामा दिला आहे. 30  मे  2019  दिवशी मोदी सरकार दुसर्‍यांदा सत्तेमध्ये आल्यानंतर हा पहिल्यांदाच मोदींनी आपल्या मंत्रीमंडळामध्ये बदल केला आहे.