Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

लोकसभा निवडणूकीसाठी आज (12 मे) सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. परंतु या मतदानाला गालबोट लागले असून बंगाल (Bengal) येथे एका टीएमसी (TMC)-भाजप (BJP) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरात ताणावाचे वातावरण तयार झाले आहे.

झारग्राममध्ये भाजप कार्यकर्ता रामेन सिंह आणि टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. परंतु टीएमसीच्या कार्यकर्त्यानी रामेन सिंह याची हत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसेच मिदानपूर येथे सुद्धा दोन टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडल्याची घटना घडली असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.(अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सुरेश याला पश्चात्ताप)

मतदानाच्या वातावरणात बेल्दा येथे ही टीएमसीच्या कार्यालवार काही जणांनी हल्ला केला आहे. मात्र आता भाजपकडून हा हल्ला केल्याचे टीएमसीकडून बोलले जात आहे. या सर्व परिस्थित मतदानाला राजकीय हिंसाचाराचे वळण लागले असल्याचे दिसून येत आहे.