अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या सुरेश याला पश्चात्ताप
Man who slapped Delhi CM Arvind Kejriwal expresses regret (Photo Credits: ANI)

दिल्लीतील (Delhi) मोतीनगर (Moti Nagar) भागात रोड शो (Roadshow) करत असताना सुरेश नावाच्या एका व्यक्तीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

त्यानंतर आता सुरेशने या कृत्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे. एएनआयशी बोलताना सुरेशने सांगितले की, "मलाच ठाऊक नाही मी केजरीवाल यांच्या कानाखाली का मारली. आता मला त्याचा पश्चात्ताप होत आहे." दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली (Video)

त्याचबरोबर सुरेश कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. "मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून मला कोणीही असे करण्यास सांगितले नव्हते. त्याचबरोबर कोठडीत असताना पोलिसांनीही माझ्या गैरवर्तन केले नाही," असेही त्याने सांगितले.

अरविंद केजरिवाल यांच्या बाबतीतील हा पहिलाच प्रसंग नसून यापूर्वी 2014 मध्ये देखील केजरीवाल यांना एका ऑटो ड्रायव्हरने कानशिलात लगावली होती.