युतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची पालघर येथे जाहीर सभा
Yogi Adityanath | (Photo credit: yogiadityanath.in)

Lok Sabha Elections 2019: शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) युतीचे पालघर (Palghar) येथील उमेदवार राजेंद्र गावीत (Rajendra Gavit) यांच्या प्रचारासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पालघर येथून शिवसेनेचे राजेंद्र गावित विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश पडवी आणि वंचित बहुजन आघाडी उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ हा अदिवासी आणि परप्रांतीय खास करुन हिंदी भाषक मतदारबहूल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारालाच आकर्शित करण्यासाठी भाजप, शिवसेना युतीने उत्तर आदित्यनाथ यांची सभा आयोजित केल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कट्टर हिंदूत्ववादी म्हणून ओळखले जातात. त्यांची भाषणेही तशीच असतात. पालघर मतदारसंगात हिंदी भाषक मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची सभा घेतल्यास हे मतदार युतीकडे वळतील अशी युतीच्या नेत्यांची धारणा आहे. दरम्यना, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार चिंतामन वनगा हे निवडणूक आले होते. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले. यात भाजप उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले. त्या वेळी शिवसेनेने चिंतामन वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती. ही लढत लक्षवेधी आणि मोठी रंजत झाली. या वेळीही योगी आदित्यनाथ हे त्यावेळचे भाजप उमेदवार राजेंद्र वनगा याच्या प्रचारासाठी आले होते. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: दुसऱ्या टप्प्यातील मतदान 95 जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 18 एप्रिल रोजी मतदान)

राजेंद्र गावित हे विद्यमान भाजप खासदार आहेत. सध्या ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे पालघर येथील जाहीर सभेसाठी येत आहेत. ही सभा नालासोपारा येथील सेन्ट्रलपार्क मौदानावर शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.