महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी:धुळे- 67.29%दिंडोरी- 64.24%नाशिक- 55.41%पालघर- 64.09%भिवंडी- 53.68%कल्याण- 44.27%ठाणे- 49.95%मुंबई उत्तर- 59.32%उत्तर पश्चिम मुंबई- 54.71%उत्तर पूर्व मुंबई- 56.31%मुंबई उत्तर मध्य- 52.84%मुंबई दक्षिण मध्य- 55.35%मुंबई दक्षिण- 52.15%मावळ- 59.12%शिरुर- 59.55%शिर्डी- 60.42%नंदूरबार- 67.64% देशातील विविध राज्यातील मतदानाची टक्केवारी:  

मुंबईतील विर्लेपार्ले येथे बॉलिवूड अभिनेते सनी देओल, बॉबी देओल यांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, अनंत आणि मुलगी ईशा अंबानी-पिरामल यांच्यासह बजावला मतदानाचा अधिकार.

महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.97% मतदान.

अभिनेते सुरेश ओबेरॉय आणि विवेक ओबेरॉय यांनी मुंबईतील जुहू येथे केले मतदान.

मुंबईमध्ये शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी वांद्रे येथे मतदान केले.

महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03 टक्के मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मतदानाच्या चौथ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार देशात 49.53% मतदान झालं आहे. तर महाराष्ट्रातील एकूण मतदान 41.15% इतके आहे.

अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांनी जुहू येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलांसोबत वांद्रे येथील मतदानकेंद्र क्रमांक 203 येथे मतदान केले. अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांनी पहिल्यांदा मतदान केलं.

Load More

LS Polls 2019 Phase 4 Voting: महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आज (29 एप्रिल) चौथ्या आणि अंतिम टप्प्यामधील 17 व्या लोकसभा निवडणूकीसाठी मतदान (Lok Sabha Elections Voting) होणार आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील 17 मतदारासंघामध्ये मतदान होईल. तर देशामध्ये आज 9 राज्यात 71 लोकसभा मतदारसंघांमध्ये 945 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदानाची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करू शकणार आहेत. मात्र त्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले आदी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना भर पगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देऊन आज मतदानाचा हक्क बजावण्याचं  आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील धुळे,दिंडोरी,नाशिक,पालघर, भिवंडी,कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य,मुंबई इशान्य,मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ,शिरुर, शिर्डी, नंदूरबार या 17 मतदारसंघांमध्ये आज नागरिक मतदान करणार आहेत. मतदान कसे करावे #भारत: ‘वंचित ना राहो कुणी मतदार’ साठी निवडणूक आयोग सज्ज, पहा कोणत्या ओळखपत्रावर करू शकता लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान?

महत्त्वाच्या लढती  

यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये मावळ मधून पार्थ पवार, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे  तर मुंबई उत्तर मतदारसंघामधून ऊर्मिला मातोंडकर निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरल्याने या वलयांकित चेहर्‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यांच्यासोबत राहुल शेवाळे (शिवसेना), एकनाथ गायकवाड (काँग्रेस), शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना), गजानन किर्तीकर (शिवसेना), गोपाळ शेट्टी (भाजप) यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. यंदा विकेंडला लागून मतदानाची सुट्टी आल्याने अनेक जण बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवू शकतात, या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींपासुन सरकारी यंत्रणेकडून मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी मोफत व्हिलचेअर आणि ने आण व्यवस्था, सखी हा केवळ महिला कर्मचार्‍यांच्या अख्यारितला तर खास दिव्यांगांसाठी दिव्यांग कर्मचारी आणि अधिकार्‍यांसह खास मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.