Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रामध्ये 29 एप्रिल दिवशी चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणूक 2019 साठी (Lok Sabha Elections) मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला समाविष्ट करण्यासाठी यंदा निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबईसह 17 मतदार संघांमध्ये पार पडणार्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव आणि सोबत नागरिकांना किमान एक वैध ओळखपत्र दाखवणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून नागरिकांना खास ओळखपत्र दिले जाते, त्यावर EPIC क्रमांक असतो. मात्र जर तुमच्याकडे हे मतदार ओळखपत्र नसेल तर कोण कोणत्या ओळखपत्राच्या आधारे तुम्ही मतदान करू शकता हे नक्की पहा. Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?
मतदानासाठी वैध ओळखपत्र
पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कार्ड, खासदार/ आमदार/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड या ओळखपत्रांच्या मदतीने देखील मतदान करू शकता. मात्र मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई आहे.
PIB in Maharashtra चं ट्विट
तू, तुम्ही, तो, ती, ते, हया आणि त्या
आपण सर्व मतदारांनो मतदानाला या
29 एप्रिल, 2019
सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत#NoVoterToBeLeftBehind pic.twitter.com/C4F4fUodv6
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) April 28, 2019
यंदा दिव्यांग,गर्भवती महिला यांच्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून खास सोय करण्यात आली आहे.दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी खास सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी काही ठिकाणी खास मतदान केंद्रउभारली जाणार आहेत. मतदारांना अडचण असल्यास मदतीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.