Lok Sabha Elections 2019: अभिनेत्री हेमा मालिनी पुन्हा एकदा मथुरा येथून निवडणुक लढवणार
Hema Malini (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: भाजप (BJP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) 29 उमेदवारांची नावे सुद्धा घोषित केली आहेत. पक्षाने मथुरा (Mathura) येथून पुन्हा एकदा अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांना उमेदवारी दिली आहे. हेमा मालिनी यांची टक्कर राष्ट्रीय लोक दलातील नरेंद्र सिंह यांच्यासोबत असणार आहे. आरएलडी सपा-बसपा गठबंधनात सहभागी आहेत. आरएलडी युपीमधील मुजफ्फरनगर, बागपत आणि मथुरा अशा तीन जागांवर निवडणुक लढवणार आहेत.

तर 2014 मध्ये हेमा मालिनी यांनी आरएलडीचे प्रत्याशी जयंत चौधरी यांना 3,30,743 मतदांनी हरवले होते. तसेच हेमा मालिनी 2014 मध्ये 5,72,633 मतदांनी विजयी झाल्या होत्या. परंतु आता रालोद मधील गठबंधनात सहभागी झाल्याने या दोन उमेदवरांमधील टक्कर अधिकच मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यंदा जयंत चौधरी ह्यांना आरएलडीच्या बागपत येथून तिकिट देण्यात आले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: भाजप पक्षातील 'या' 5 महत्वाच्या नेत्यांबद्दल जाणून घ्या)

हेमा मालिनी ट्वीट:

सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सहा जागांसाठी निवडणुक लढवणार आहे. गुरुवारी भाजपने 20 राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.