Kangana Ranaut: पंजाबमध्ये पंतप्रधानाच्या सुरक्षेबाबत झालेल्या हलगर्जीपणावर कंगना रणौत संतापली, म्हणाली - हा लोकशाहीवर हल्ला आहे
Kangana Ranaut (Photo Credit - Instagram)

कंगना राणौतने (Kangana Ranaut) अनेक प्रसंगी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या समर्थनार्थ आपले मत व्यक्त केले आहे. आता कंगणाने पंजाबमधील (Punjab) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत झालेल्या हालगर्जीपणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमधील या घटनेमुळे कंगना चांगलीच संतप्त झाली असून तिने याला लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्या थांबल्या नाहीत तर त्याची किंमत देशाला चुकवावी लागेल, असंही कंगना रणौत म्हणते. बुधवारी पंजाबला गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला काही आंदोलकांनी अडवले, त्यामुळे त्यांना परतावे लागले. ही घटना सुरक्षेतील मोठी त्रुटी दर्शवते, जी आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कंगना राणौतनेही या संपूर्ण घटनेला अत्यंत लाजिरवाणे म्हटले आहे.

पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते आहेत

गुरुवारी कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले - पंजाबमध्ये जे घडले ते अतिशय लाजिरवाणे आहे. माननीय पंतप्रधान हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आणि प्रतिनिधी आहे. पंतप्रधान देशातील लोकांचा आवाज आहेत, आणि त्यांच्यावरील हल्ला हा प्रत्येक भारतीयावरील हल्ला आहे. तसेच हा हाल्ला सुद्धा आपल्या लोकशाहीवरचा आहे. पंजाब हे दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत चालले आहे, ते आता थांबवले नाही, तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल.

(Photo Credit - Instagram)

बुधवारी पंतप्रधान भटिंडा येथे पोहोचले होते, तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. खराब हवामानामुळे पीएम मोदींनी 20 मिनिटे वाट पाहिली आणि हवामान स्वच्छ नसताना त्यांनी रस्त्याने स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. (हे ही वाचा 'Bulli Bai' App Case: बुल्ली बाई अ‍ॅप निर्माण करणारा आणि मुख्य सूत्रधार 20 वर्षीय Neeraj Bishnoi ला दिल्ली पोलिसांच्या विशेष टीम कडून अटक.)

वृत्तानुसार, पंजाब पोलिसांच्या डीजीपीने सुरक्षा सुविधांची पाहणी केल्यानंतर, पीएम मोदी रस्त्याने स्मारकाकडे गेले, परंतु स्मारकापर्यंत पोहोचण्यापूर्वी सुमारे 30 किमी आधी पीएम मोदींच्या ताफ्याला आंदोलकांनी रोखले. 15 ते 20 मिनिटे पीएम मोदी प्लायओव्हरवर अडकले आणि रस्ता मोकळा न झाल्याने ते त्याच मार्गाने परत भटिंडा विमानतळावर गेले.