Nirish Kumar and PM Narendra Modi (Photo Credits: PTI/File)

पाटणामध्ये (Patna) आज (15 नोव्हेंबर) झालेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नीतीश कुमार (JD(U) Chief Nitish Kumar) यांची बिहारच्या विधानसभेत नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता नितीश कुमारांकडेच पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र दिली जातील अशी माहिती देण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये महागठबंधनसमोर आव्हान देण्यासाठी जेडीयू आणि भाजपा एकत्र उभी ठाकली होती. दरम्यान 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूकीत एनडीएमध्ये भाजपला (BJP) 74, जेडीयू (JDU) ला 43, मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या तुलनेत जेडीयुला कमी जागा मिळाल्याने आता मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आज अखेर नीतीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सार्‍या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बिहार मध्ये जनतेने झिडकारल्यावर मुख्यमंत्री पदी नितीश कुमारांना लादणे हा लोकमताचा अवमान; शिवसेनेची सामनाच्या अग्रलेखातून टीका

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीतीश कुमार यांचा शपथविधी सोहळा उद्या (16 नोव्हेंबर) पार पडणार आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास नीतिश कुमार शपथ घेतील अशी माहिती दिली आहे. एनडीएच्या बैठकीला आज भाजपाकडून राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली होती. 69  व्या वर्षी नीतीश कुमार 7व्यांदा शपथ घेणार आहेत. तर सलग ही त्यांची मुख्यमंत्रीपदाची चौथी टर्म आहे.

AN Tweet

दरम्यान बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणी दरम्यान महागठबंधनने पोलिंग बुथवर कर्मचार्‍यांवर नीतीश कुमार दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. तसेच एनडीए 'चोर दरवाजाने' जाऊन सत्तेवर बसली आहे अशी टीका राजदच्या तेजस्वी यादव यांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनि पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर असलेल्या दबावाचे आरोप फेटाळले होते.

बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्यानुसार एनडीएकडे 124 जागा असल्याने त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. परिणामी त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होता.