महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की फोन टॅपिंग (Phone Tapping Case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना CrPC कलम 160 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार, देवेंद्र फडणवीस यांना उद्या सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) सायबर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले होते, दरम्यान याबाबत आता नवीन बातमी समोर आली आहे की, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जाणार नाहीत. त्याऐवजी मुंबई सायबर पोलीस त्याच्या सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Tweet
मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.
जयहिंद, जय महाराष्ट्र !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
BKC पोलीस स्टेशनजवळ भाजप करणार होते शक्ती प्रदर्शन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. (हे ही वाचा Anil Deshmukh Case Update: अनिल देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना धमकावल्याचा आरोप, CBIने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची केली 6 तास चौकशी)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा केला होता आरोप
2016-17 मध्ये त्यांचा फोन टॅप झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. केवळ त्यांचेच नव्हे तर भाजप खासदार संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या आरोपानंतर राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती.