दिल्ली विधानसभा निवडणूक निकालासाठी आज (11 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने दिल्लीकरांनी मतदान केल्याने सुमारे 70 जागांपैकी 53 जागांवर आम आदमी पार्टी आघाडीवर आहे तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर असल्याचं सुरूवातीच्या कलांमधून समोर आलं आहे. त्यामुळे 70 जागांपैकी सुमारे 53 जागांवर आप पुढे असल्याने आम आदमी पार्टीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं चित्र आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीतील निकालामुळे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) विजयाच्या हॅट्रिकच्या जवळ आहेत. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची प्रतिक्रिया; भाजपाच्या विजयाबद्दल आशादायी.
दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून सुमारे 4387मतांनी आघाडीवर आहेत. मात्र त्यांना भाजपाचे सुनील यादव कडवी झुंज देत आहेत. आपच्या मागील सरकारमधील अरविंद केजरीवाल 2020 च्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये विजयी ठरल्यास त्यांच्या विजयाची हॅट्रिक होणार आहे. दरम्यान आपच्या विजयामुळे दिल्लीमध्ये आप कार्यालयं आणि कार्यकर्ते आनंदामध्ये आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदिया देखील आघाडीवर आहेत. 'आप' ला बहुमत मिळाले असले तरीही त्यांच्या जागा कमी झाल्याचं सुरूवातीच्या कलांमधून समोर आलं आहे. तर भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी जो निकाल लागेल त्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारेल असं त्यांनी म्हटलं आहे.