Delhi Elections 2020:  दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया पिछाडीवर; AAP पक्षासाठी धक्का
Manish Sisodia | Photo Credits: Twitter

Delhi Vidhan Sabha Election Results:  दिल्लीकरांनी आपच्या बाजूने कौल दिला असला तरीही तिसर्‍या फेरीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया (Manish Sisodia) सुमारे 1427 मतांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान दिल्लीतील पटपड़गंज (Patparganj) मतदार संघातून मनीष सिसोदिया निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये तिसर्‍या फेरीनंतर मनीष सिसोदियांना 4945 मतं मिळली असून त्यांना आव्हान देणार्‍या भाजपाच्या रवी नेगी (Ravi Negi)  यांना 4983 मतं मिळाली आहेत अशी माहिती ANI वृत्त संस्थेने केलेल्या ट्वीटमधून समोर आली आहे. तर चौथ्या फेरीनंतर ते 754 मतांनी पिछाडीवर होते. तर पाचव्या फेरीनंतर 1576  मतांनी ते मागे आहेत. दरम्यान दिल्ली विधान सभा निवडणूकीच्या 70 जागांपैकी आपचे 57 उमेदवार आघाडीवर आहेत तर भाजपा 13 जागांवर आघाडीवर आहे. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मुंबईतही जल्लोष

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदार संघातून आघाडीवर असल्याने आता त्यांच्या विजयाची हॅट्रिक होणार आहे. तसेच ते सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याच्या तयारीमध्ये आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आपचे कार्यकर्ते आनंद सेलिब्रेट करत आहेत. आज सकाळी मनीष सिसोदिया यांच्या विजयाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी आशा व्यक्त केली होती. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये मनीष सिसोदिया हे प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. त्यांचा पराभव झाल्यास तो आम आदमी पार्टीसाठी एक मोठा धक्का असेल.

ANI Tweet

दरम्यान मनीष सिसोदिया यांनी विजयासाठी प्रार्थना करताना 'ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय।। हे ईश्वर! हमको असत्य से सत्य की ओर ले चलो। अंधकार से प्रकाश की ओर ले चलो। मृत्यु से अमरता के भाव की ओर ले चलो।' अशा आशयाचं एक ट्वीट केलं होतं.