Delhi Assembly Election 2020: राजकीय पक्षांचा निवडणूकींसाठी नवा प्लान; TikTok च्या माध्यमातून करणार मतदारराजाला खुश करण्याचा प्रयत्न

सोशल मिडिया सध्या तेजीत असल्यामुळे याच सोशल मिडियाचा एक भाग असलेल्या TikTok चा देखील वापर करणार असल्याचे या पक्षांकडून सांगण्यात येत आहे. इकॉनॉमिक टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉकच्या माध्यमातून निवडणूकीदरम्यान सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करणार आहेत.

राजकीय Poonam Poyrekar|
Delhi Assembly Election 2020: राजकीय पक्षांचा निवडणूकींसाठी नवा प्लान; TikTok च्या माध्यमातून करणार मतदारराजाला खुश करण्याचा प्रयत्न
TIk Tok | (Photo>

TIk Tok | (Photo Credits-Gettey Images)

विधानसभा निवडणूक 2020 सत्तासंघर्षाचा तिढा अखेर सुटला. आता नवीन वर्षात दिल्ली विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहेत. याच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी विशेष तयारी सुरु केली आहे. मतदारराजाला खुश करण्यासाठी दिल्लीतील सर्वच राजकीय पक्ष प्रत्येक माध्यमाचा वापर करणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यात सोशल मिडिया सध्या तेजीत असल्यामुळे याच सोशल मिडियाचा एक भाग असलेल्या TikTok चा देखील वापर करणार असल्याचे या पक्षांकडून सांगण्यात येत आहे. इकॉनॉमिक टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, टिकटॉकच्या माध्यमातून निवडणूकीदरम्यान सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करणार आहेत.

मात्र मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर सारखे टिकटॉकने देखील याआधी असे घोषित केले होते की, ते आपल्या प्लेटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षांची जाहिरात करणार नाही. त्यामुळे काही तरी वेगळ्या माध्यमातून पक्षाचा प्रचार केला जाणार आहे. Maharashtra Government Formation: व्हीप म्हणजे नक्की काय? व्हीप काढण्याचा कोणाला असतो अधिकार?

इकॉनॉमिक टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार नरेश अरोड़ा यांनी सांगितले की आम्ही निवडणुकीसाठी टिकटॉकचा खूप गांभीर्याने विचार करत आहोत. त्यांचे असे म्हणणे आहे की हा अॅप तरुणांना एखाद्या व्यसनाप्रमाणे जडला आहे. त्यामुळे त्याचप्रकारे तो तरुणांना आवडला पाहिजे आणि पक्षांचा प्रचार देखील झाला पाहिजे.

DesignedBoxed ने हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसचे अभियान राबविले होते. त्याचप्रमाणे टिकटॉकची वाढती लोकप्रियता बघता आगामी दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी काहीतरी करता यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change