Deepak Kesarkar On Narayan Rane: दीपक केसरकर यांची नारायण राणेंनवर टीका, बोलयच आहे तर संसदेत बोला, कामाचा चांगला 'परफॉर्मन्स' दाखवा
Deepak Kesarkar & Narayan Rane (Photo Credit - FB)

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबईत पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. त्यात राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. या टीकेला शिवसेना नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या कुटुंबाने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले, त्यांच्याबद्दल बोलताना केसरकर म्हणाले की, त्यांनी आपली जीभ थोडी संभालुन वापरावी. बोलायचे असेल तर लोकसभेत बोला. तुमच्याकडे क्रेंदात एवढ मोठ खात आहे, काम करुन राणेंनी चांगला 'परफॉर्मन्स' दाखवावा, असे आव्हानही केसरकर यांनी दिले. किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर त्यावेळी सोमय्या यांनी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे समर्थन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनाही लक्ष्य करण्यात आले. या टीकेला केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुशांत सिंगचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. ही तुमची परीक्षा आहे. मग सीबीआय तपास का पुढे चालू ठेवत नाही? ज्यांचा काहीही संबंध नाही त्यांच्यावर आरोप आणि बदनामी का करायची? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला होता. (हे ही वाचा Mumbai Police Summons: किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांनी बजावले समन्स, हजर न राहिल्यास होणार कारवाई)

संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले का? मग तुम्ही का त्यांना बोलता. तुम्हाला साध लोकसभेत उत्तर देता येत नाही, मग तुम्ही इथे येऊन का बोलत आहात?, असे केसरकर म्हणाले. किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद केली तर. त्यामुळे त्यावेळी किरीट सोमय्या यांनी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? त्यावेळी तुम्ही चौकशीला सामोरे न जाता दुसरीकडे गेलात. सोमय्यानां तुम्ही का पांठिबा देत आहात? राऊत कोणाबद्दल बोलत आहेत? त्यात तुम्ही का उडी मारता आहात असा सवालही केसरकर यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात चांगले रस्ते केले, राणे यांचे कडे चांगले खाते असुनही त्यांनी काही नाही केल. त्यांना क्रेंदात फक्त बसायला बोलवल आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.