Digvijaya Singh (Photo Credit- IANS)

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये (Congress President Election) अजून एक ट्वीस्ट आज पहायला मिळाला आहे. शशी थरूर यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार असणार्‍या दिग्विजय सिंह यांनी माघार घेत मलिक्कार्जुन खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दिग्विजय सिंह काल पर्यंत अर्ज भरण्याच्या तयारीत होते मात्र रात्री सोनिया गांधींसोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे.

आज दिग्विजय सिंह यांनी मलिक्कार्जुन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 'खर्गे यांच्यासारख्या मोठ्या कॉंग्रेस नेत्या विरूद्ध निवडणूक लढण्याचा विचार करू शकत नाही.' अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. 'मीडीया रिपोर्ट्स मधून त्यांच्या उमेदवारी बद्दल कळलं त्यानंतर स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलून हा निर्णय घेतला. त्यांनी आधी सांगितलं असतं तर फॉर्मच घेतला नसता.' असे सिंह म्हणाले आहेत. Congress President Polls 2022: Shashi Tharoor दुपारी 12 च्या सुमारास नॉमिनेशन फॉर्म भरणार; Mallikarjun Kharge देखील रिंगणात उतरण्याची चर्चा .

मल्लिकार्जुन खर्गे यांनी भरला अर्ज

आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ आहे. काल अशोक गेहलोत यांनी माघार घेतली आहे. आज शशी थरूर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शशी थरूर विरूद्ध मलिक्कार्जून खर्गे अशी लढाई होण्याचा अंदाज आहे.