राफेल (Rafale Deal) विमान खरेदी करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारले होते. परंतु राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची अद्याप उत्तरे मिळाली नसल्याने काँग्रेस पक्षाकडून राफेल पंतंगांची उड्डाणे करण्यात आली आहे. तसेच या पतंगावर राफेल बाबत प्रश्न विचारले गेले आहेत.

राजस्थान येथे काँग्रेसने मकरसंक्रांती निमित्त पतंगांवर राफेलबद्दल प्रश्न असलेल्या पतंगा उपस्थित केल्या आहेत. यावर राफेल कराराबाबत विविध प्रश्नांची विचारणी केली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक भागात या पतंगाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रसेने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत मोदींना राफेल कराराबद्दल चार प्रश्न विचारले होते.

1. हवाई दलात 126 राफेल विमानांची गरज असताना 36 विमाने का?

2. राफेल विमानांची किंमत 560 कोटी असून 1600 कोटी कशासाठी?

3. राफेल करारासाठी अनिल अंबानी यांचीच कंपनी कशासाठी?

4. तसेच पर्रीकर यांनी राफेल कराराबाबत फायईल्स बेडरुम मध्ये ठेवल्या आहेत त्याचे रहस्य काय?

अशा पद्धतीचे चार प्रश्न पंतंगावर छापलेले आहे. तसेच चौकीदार चोर असल्याची घोषणा पतंगावर छापण्यात आलेली आहे.