Kunal Kamra gives bribe to Raj Thackeray (PC - Twitter)

'शट अप कुणाल' या कार्यक्रमात (Shut Up Kunal Program) सहभागी होण्यासाठी कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना चक्क वडापावची 'लाच' (Bribe) दिली आहे. कुणालने लाचेच्या स्वरुपात राज ठाकरेंच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील बटाटा वडे आणले होते. यासंदर्भात कुणालने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे कुणालने वडापावसोबत राज ठाकरेंना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात कुणालने राज ठाकरे यांना आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात कुणालने लिहलं आहे की, 'मला बऱ्याच तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचं समजलं. म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देत आहे. जेणेकरून तुम्ही माझ्या ‘शट अप कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.' (हेही वाचा - आमच्या कामांना स्थगिती देणं इतकंच सरकारचं काम- रावसाहेब दानवे)

कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानात प्रवासादरम्यान पत्रकार अर्नब गोस्वामी यांना प्रश्न विचारत व्हिडीओ काढला होता. त्यामुळे इंडिगोने कुणाल कामरावर 6 महिन्यांची बंदी घातली होती. या बंदीविरोधात कुणाल कामराने इंडिगो एअरलाईन्सला कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये आपल्यावरील बंदी उठवावी आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल 25 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही कुणालने इंडिगो एअरलाइन्सकडे केली होती.