Facebook Bans BJP Leader T Raja Singh: भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून बंदी; Hate Speech Policy च्या उल्लंघनानंतर फेसबुकची कारवाई
BJP Leader Raja Singh (Photo Credits: ANI)

फेसबुकने (Facebook) भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) तेलंगणाचे (Telangana) नेते टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्यावर बंदी घातली आहे. फेसबुकच्या Hate Speech Policy चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेत्यांचे द्वेषयुक्त भाष्याकडे फेसबुककडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार फेसबुककडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राजा सिंह यांच्या विरुद्ध फेसबुकने हे पाऊल उचलले.

एनडी टीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकच्या प्रवक्तांनी एका इमेल स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, "आमच्या Hate Speech Policy चे उल्लंघन केल्याप्रकरणी राजा सिंह यांच्यावर आम्ही बंदी घालत आहोत. फेसबुकवर केवळ असण्याने देखील वाद निर्माण होत असतील अशा सर्व व्यक्तींवर आम्ही बंदी घालत आहोत."

Wall Street Journal यांनी गेल्या महिन्याच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुकचे भारतातील सिनियर पॉलिसी एक्सिक्युटीव्ह Ankhi Das यांनी राजा सिंह यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रक्रीयेत अडथळा आणला होता. राजा सिंह यांनी मुस्लिमांविरुद्ध वादग्रस्त भाष्य केले होते. दास यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोदींच्या भाजप विरुद्ध कोणतेही पाऊल उचलल्यास कंपनीच्या भारतातील व्यवसायाला धोका पोहचू शकतो, असे WSJ च्या रिपोर्टमध्ये म्हटले होते.

यापूर्वी काँग्रेसने देखील फेसबुक आणि व्हॉट्सअॅप भाजपच्या बाजुने असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मार्क झुकरबर्ग यांना पत्राद्वारे सुद्धा यासंदर्भात कळवले होते. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने 44 फेसबुक पेजेस विरुद्ध फेसबुककडे तक्रार दाखल केली होती. त्यापैकी 32% म्हणजेच 14 पेजेस फेसबुककडून त्वरीत बंद करण्यात आले होते.