Gujrat New CM Oath Ceremony: गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र (Bhupendra Patel) पटेल आज दुपारी 2.20 वाजता राज्याच्या 17 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सुद्धा उपस्थितीत राहणार आहेत. आज फक्त भूपेंद्र पटेलच शपथ घेणार आहेत. तर रविवारी संध्याकाळी भूपेंद्र पटेल यांनी राजभवानात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेत राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला.(Political Journey Of Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल आमदार म्हणून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले, जाणून घ्या असे कसे घडले?)
55 वर्षीय भूपेंद्र पटेल यांची रविवारी अहमदाबाद मध्ये सर्वांच्या संमतीने भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. सीएम रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 182 सदस्यीय विधानसभेत भाजपचे 112 खासदारांपैकी अधिक जण बैठकीला उपस्थितीत होते.
Tweet:
Bhupendra Patel to take oath as Gujarat Chief Minister today
Read @ANI Story | https://t.co/3Vo6UoqnkA#Gujarat pic.twitter.com/odCevc8kEK
— ANI Digital (@ani_digital) September 13, 2021
भूपेंद्र पटेल यांना मृदुभाषी कार्यकर्त्याच्या रुपाने ओळखले जाते. पटेल यांनी नगर पालिका स्तर नेता ते प्रदेशातील राजकरणात मुख्य पदावर आपल्या भुमिका उत्तम पार पाडल्या आहेत. तसेच त्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदाच राज्यातील घाटलोडिया विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवत 1.17 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. आपल्या समर्थकांकडून त्यांना दादा म्हणून संबोधले जाते. पटेल हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशातील राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. तसेच ते विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. या व्यतिरिक्त गांधीनगर लोकसभा जागेवर ही त्यांचा हिस्सा असून येथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासदार आहेत.
पटेल 2015-2017 दरम्यान अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुद्धा होते. यापूर्वी त्यांनी 2010 रोजी ते 2015 पर्यंत गुजरातची सर्वाधिक मोठी शहरी संस्था अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भुषवले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग ते डिप्लोमाचे शिक्षण घेतलेल्या पटेल यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी स्थानिक राजकरणात त्यांनी सहभाग घेतला होता. ते अहमदाबाद जिल्ह्यातील मेमनगर नगरपालिकेचे सदस्य होते आणि दोन वेळा त्याचे अध्यक्ष झाले. ते पाटीदार समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी समर्पित असलेल्या सरदारधाम विश्व पाटीदार केंद्राचे विश्वस्त आहेत.