Assembly Elections 2021 Results Live News Updates: नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री Mamata Banerjee पराभूत, Suvendu Adhikari यांनी मारली बाजी
राजकीय
टीम लेटेस्टली
|
May 03, 2021 12:52 AM IST
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात होणार आहे. पश्चिम बंगाल मध्ये 294, तमिळनाडू मध्ये 234, असम मध्ये 126, पुदुचेरी 30 आणि केरळ मध्य 140 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा आज निकाल रात्रीपर्यंत हळूहळू स्पष्ट होणार आहे. दरम्यान यामध्ये भाजपासाठी असम, पश्चिम बंगाल मध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे त्यामुळे या राज्यांमध्ये लढाई कशी रंगतदार होते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. या पाचही विधानसभा निवडणूकीचे निकाल, सुरूवातीचे कल आणि हळूहळू जहीर होणारे विजयी उमेदवार यांचे अपडेट्स लेटेस्टी मराठीच्या लाईव्ह ब्लॉग वर पाहता येणार आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर आता त्यांच्या निकालाच्या वेळेसही देशातील कोविड 19 परिस्थितीचं भान राखत निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. विजयीमिरवणूकांचे रथ रोखण्यात आले आहेत तर पोलिंग बूथ वरही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी १४८ चा आकडा पार करावा लागणार आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहेत. केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक आहेत तर आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक आणि पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.